दोन दिवसांत दुसरा खून!; संकट मोचन परिसरील घटना
सूरज गाताडे (वय २१) रा. संकट मोचन परिसर यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे. सूरज हा नगर परिषदेच्या कचरा गाडीवर सहाय्यक म्हणून कार्यरत होता. आज शुक्रवारी रात्री ९.४५ च्या सुमारास जगत मंदिर रोड परिसरात अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत तो काही अंतर पळून गेला, मात्र गुल्हाने हॉटेलजवळ तो कोसळला. त्यानंतर हांडे यांच्या घराजवळ त्याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. ही माहिती मिळताच त्याचे आई-वडील घटनास्थळी पोहोचले आणि त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल कॉलेज) दाखल केले. उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय अधिकारी दिनेश बैसाणे, अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेश रणधीर यांच्यासह कमांडो पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
केवळ दोन दिवसांपूर्वी शहरात आणखी एका युवकाचा खून झाला होता. त्यानंतर आज पुन्हा खून झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सूरज दाताळेची हत्या नेमकी कशामुळे झाली, हल्लेखोर कोण होते याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
0 Comments