दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथील घटना
यवतमाळ : पाण्याने भरलेल्या गड्ड्यांमध्ये भाऊ–बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथील साईनगरी लेआऊटमध्ये बुधवार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रियांका गणेश राठोड (वय १० वर्षे) , कार्तिक गणेश राठोड (वय ८ वर्षे) अशी मृतक बहिण- भावाचे नाव आहे. दारव्हा-आर्णी रोडला लागून असलेल्या या लेआऊटमध्ये अंदाजे दहा फूट खोल गड्डे खोदण्यात आले होते. या गड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने मुले पोहण्यासाठी गेली होती. मात्र पोहता न आल्याने ती बुडाली. त्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. ३० सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत मुले घरी परतली नसल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजताच्या सुमारास या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अशा धोकादायक गड्ड्यांवर त्वरित सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
0 Comments