यवतमाळ (प्रतिनिधी) : यवतमाळ तालुक्यातील
मौजा चीचघाट येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. देविदास नामदेव शेरकुरे (वय अंदाजे ७०
वर्षे) हे आज सायंकाळी ६
वाजता शिवणी गावाहून परत येत असताना, शिवणी रस्त्यावरील पुलावरून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू असतानाच पाय घसरून थेट पाण्यात वाहून गेले. गेल्या काही तासांपासून या भागात
मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे
ओढ्यांना पूर आला असून अनेक पुलांवरून पाणी वाहू लागले आहे. शेरकुरे हे
दररोजप्रमाणे आपल्या घरी परतत होते, मात्र पावसाच्या पाण्यामुळे पुलावरून पाय घसरल्याने ही
दुर्दैवी घटना घडली. तहसीलदार यवतमाळ
यांच्या आदेशानुसार शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलिस व
स्थानिक बचावपथक घटनास्थळी दाखल झाले असून, शोधकार्य सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
The Menu of this blog is loading..........
0 Comments