यवतमाळ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) यवतमाळने उपवनसंरक्षक कार्यालयातील वनसर्वेक्षक सुमीत शंकरराव अक्कलवार (वय 32) याला 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. आज बुधवार 10 सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदाराने जोडमोहा वनपरिक्षेत्रातील रुईकर ट्रस्टच्या सागवान वृक्षतोड परवानगीसंदर्भात अर्ज दिला होता. सीमांकन अहवाल तयार करण्यासाठी अक्कलवार यांनी 30 हजार रुपयांची मागणी केली. पडताळणीदरम्यान त्याने प्रत्येकी अहवालासाठी 5 हजार रुपयांप्रमाणे एकूण 15 हजार रुपये घेण्याची तयारी दर्शवली. 10 सप्टेंबर रोजी उपवनसंरक्षक कार्यालय, यवतमाळ येथे सापळा रचण्यात आला. त्यावेळी अक्कलवारने तक्रारदाराकडून 15 हजार रुपये स्वीकारले आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप (अमरावती परिक्षेत्र ACB), अपर पोलीस अधीक्षक सचींद्र शिंदे (अमरावती) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर (ACB, यवतमाळ) , पोलीस निरीक्षक मनोज ओरके, पोहवा अतुल मते, पोहवा जयंत ब्राम्हणकर, पोहवा अब्दुल वसीम, पोना सचिन भोयर, राकेश सावसाकडे, पोकॉं. इफराझ काझी आणि चालक श्रेणी पोउपनि संजय कांबळे यांनी केली.
नागरिकांना आवाहन
शासकीय लोकसेवकांनी लाच मागितली असेल, तर नागरिकांनी ACB यवतमाळकडे तक्रार व पुरावे सादर करावेत. तसेच, अशा तक्रारींसाठी 07232-244002, मोबाईल क्रमांक 8975791064 किंवा टोल-फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments