भाजपने प्रत्येक मतदार संघात घोटाळा केला; माजी मंत्री महादेव जानकर यांचा घाणाघात
September 09, 2025
यवतमाळ : “भाजपाने प्रत्येक मतदारसंघात २५ ते ३० हजार मतांचा घोटाळा केला आहे. आत्मविश्वास दांडगा असता तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्याची गरज पडली नसती,” असा घणाघात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजीमंत्री महादेव जानकर यांनी केला.
यवतमाळ येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, “लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात. निवडणुकीपूर्वी राज्यकर्ते शेतकऱ्यांची भाषा करतात; मात्र सत्तेत आल्यानंतर ते शेतकऱ्यांना विसरतात. महाराष्ट्रात पिकविमा काढला जातो, पण त्याचा लाभ फक्त मोजक्या शेतकऱ्यांनाच मिळतो. उर्वरितांची लूट होते. मग गुजरातमध्ये पिकविमा का नाही?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष केशव मुडे, मोहसीन शेख, सूरज ठाकुर उपस्थित होते.
0 Comments