यवतमाळ : अवधुतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील कुख्यात गुंड वृषीकेश ऊर्फ वृषभ ऊर्फ जब्बा उमेशराव वानखेडे (वय २६, रा. रामकृष्णनगर, मुलकी) याला एमपीडीए कायद्यान्वये एका वर्षासाठी अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
सन २०१८ पासून वानखेडेवर घातक शस्त्र बाळगणे, मारहाण, संपत्तीचे नुकसान, गंभीर जखमी करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न, जबरी चोरी अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या कृत्यांमुळे यवतमाळ शहर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रतिबंधक कारवाई करूनही त्याची गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसल्याने अवधुतवाडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेश रणधिर यांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला. जिल्हाधिकाऱ्यांनी १२ जून २०२५ रोजी आदेश दिल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेत आज ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (ठाणेदार) नरेश रणधिर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक : सिता वाघमारे, एपिआय श्रीकांत जिंदमवार, पोलीस उपनिरीक्षक : सुरज जगताप, सहाय्यक फौजदार : गजानन वाटमोडे, सुरेश मेश्राम पोलीस हवालदार : विशाल भगत, बलराम शुक्ला, विलास मुंडे, पोलीस नाईक : रुपेश ढोबळे, पोलीस कॉन्स्टेबल : मोहम्मद भगतवाले, कमलेश भोयर, प्रशांत पाटीत, योगेश चोपडे, नितीन खवडे, महिला पोलीस शिपाई : रोशनी जोगळेकर यांनी पार पाडली.
0 Comments