१५ हजारांची घेतली लाच; दारु व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी लाचखोरी
तक्रारदार हे यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील मालापूर येथील असून, किराणा दुकानासोबत दारुविक्रीचा परवाना धारक आहेत. १६ जुलै रोजी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, अमरावतीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून MH 29 AR 1036 क्रमांकाची होंडा अमेझ कार जप्त केली होती. हे वाहन सोडण्यासाठी आणि दारुविक्री सुरू ठेवण्यासाठी निरीक्षक दाबेराव यांनी दरमहा १५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती कार्यालयात तक्रार दाखल केली. पडताळणीदरम्यान आरोपीने लाच मागणीची कबुली दिल्यानंतर, गुरुवारी दुपारी २.२१ ते २.३० वाजता अमरावतीतील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात सापळा रचण्यात आला. दाबेराव यांच्या सांगण्यावरून चालक देहाडे यांनी तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्वीकारले.
कारवाई करणारे पथक
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुजाता बन्सोड यांच्या नेतृत्वाखाली पो.हवा. प्रमोद रायपुरे, पो.शि. शैलेश कडु, पो.शि. आशिष जांभोळे व चालक पो.उपनि. सतीश किटूकले यांच्या पथकाने केली. दोन्ही आरोपींविरुद्ध राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन
कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास टोलफ्री क्र. 1064 किंवा 0721-2552355, 2553055 या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.
0 Comments