ब्रेंकीग: पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या; जिल्हा पोलीस दलात खळबळ

यवतमाळ : वणी येथून बदली होऊन आलेल्या एका पोलीस शिपायाने बिटरगाव पोलीस ठाण्यातील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. १०) दुपारी उघडकीस आली. या घटनेने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

संदीप किसन केंद्रे (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. केंद्रे यांची वणी येथून यवतमाळ पोलीस मुख्यालयात बदली झाली होती. त्यानंतर त्यांना बिटरगाव पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आले होते. दरम्यान, चार-पाच महिन्यांपूर्वी परेडसाठी त्यांना पुन्हा पोलीस मुख्यालयात बोलाविण्यात आले. मात्र, ते तेव्हापासून सतत गैरहजर होते. शनिवारी (दि. ९) रात्रीच्या सुमारास त्यांनी गळफास घेतला. मात्र, ही घटना रविवारी (दि. १०) दुपारी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच बिटरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. संदीप केंद्रे यांनी आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.




Post a Comment

0 Comments