पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; विधिसंघर्ष बालकाचा सहभाग

आरोपी संकेत पवार (२६), किशोर सूर्यवंशी (३६), सौरभ कासारदार (२९) सर्व रा. बागवाडी, वेदान्त पोकळे (२६) रा. कुंभारकिन्ही पुनर्वसन, तसेच एका विधिसंघर्ष बालकाचा यात समावेश आहे. विधिसंघर्ष बालकाला वगळता इतर चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पिडित महिला ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता बागवाडी येथे बहिणीकडे गेली होती. घरी परतत असताना आरोपींनी तिला रस्त्यात अडवून एका लेआऊटवर नेले आणि रात्री ९ वाजल्यापासून पहाटे ४ वाजेपर्यंत तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या घटनेबाबत पिडितेच्या बहिणीने १० ऑगस्ट रोजी दारव्हा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३७६ (डी), तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश तारक करीत आहेत.
1 Comments
मस्त 👌
ReplyDelete