अन् लाडक्या बहिणींनी रक्ताने लिहीले उपमुख्यमंत्र्याला पत्र ; आत्महत्या करण्याची मागितली परवानगी

आझाद मैदानातील दुकाने हरविले; पन्नास दिवसांपासून व्यवसाय ठप्प

यवतमाळ : शहरातील आझाद मैदानात गेली पन्नास ते साठ वर्षे भेळ, पाणीपुरी, पावभाजी, चिवडा इत्यादी पदार्थांसह कापड व अन्य छोटी दुकाने चालवणाऱ्या व्यवसायीकांचा व्यवसाय बंद पडल्यामुळे सहपरिवार इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. यासंदर्भातील पत्र लाडक्या बहिणींनी उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांना रक्ताने लिहून पाठविले आहे.

व्यवसायीकांचे म्हणणे आहे की, दोन महिन्यांपूर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांनी नोटीस देऊन आझाद मैदानातील त्यांची दुकाने हटवली. या व्यवसायावर व्यापारी व त्यांचे कुटुंबीय, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च, बँक कर्जफेड, गटाचे हफ्ते अशा सर्व गरजा अवलंबून होत्या. दुकाने हटवल्यानंतर माननीय पालकमंत्री संजय राठोड यांनी “सध्या दुकान काढा, नंतर हातगाडीवर व्यवसायाची व्यवस्था करू” असे आश्वासन दिले होते. त्यानंतर इंदौरप्रमाणे खाऊगल्लीसारखी जागा उपलब्ध करून देण्याचेही सांगितले. मात्र दोन महिने उलटूनही कोणतीही व्यवस्था न झाल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक संकट टोकाला गेले आहे. त्यामुळे आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी किंवा अन्यथा सहपरिवार आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. या पत्रावर सर्व लाडक्या बहिणींच्या सह्या असून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना प्रत पाठविण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments