ब्रेकींग: महिला कंडक्टरची झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न; ऑटोचालकाच्या तत्परतेने बचाव

यवतमाळ : पुसद बस आगारात काल गुरुवारी दुपारी घडलेल्या धक्कादायक प्रकारात एका महिला वाहकाने झाडावर चढून दोरीच्या साहाय्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. ऑटोचालकाच्या वेळीच केलेल्या मदतीमुळे तिचा जीव वाचला. 

प्राप्त माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी तिकीट वादातून या महिला कंडक्टरकडून एका विद्यार्थिनीला बस आगारातील प्रवासी निवाऱ्यात मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी विद्यार्थिनीने पुसद शहर पोलीस ठाणे तसेच आगार व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार केली होती. परिणामी, महिला वाहकाविरुद्ध एनसी अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.

या मानसिक तणावातूनच तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. घटनेच्या वेळी ठाणेदार सेवानंद वानखडे व पोलिस पथक घटनास्थळी हजर होते. दरम्यान, जवळच असलेल्या एका ऑटोचालकाने तत्परता दाखवत महिलेला सुखरूप खाली उतरवले. पोलिसांनी तिचे समुपदेशन करून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments