यवतमाळ : जिल्हा पोलीस दलातील मोटर परिवहन विभागात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःच्याच घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना यवतमाळ शहरातील विठ्ठलवाडी परिसरात आज सकाळी 8 ते 9 वाजताच्या सुमारास घडली.
सचिन अनिल नारखेडे वय 37 राहणार विठ्ठलवाडी भाजी मंडी यवतमाळ असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ते मोटर परिवहन विभागात कार्यरत होते. दरम्यान आज बुधवारी सकाळी घरी कोणी नसताना नारखेडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
0 Comments