
८ जून रोजी वंजारी फैल भागात वेल्डिंग काम करणाऱ्या युवकावर केवळ मोबाईल क्रमांक का दिला नाही, या कारणावरून टोळीतील सदस्यांनी प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी पो.स्टे. यवतमाळ शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापुढे तपास केला असता ही टोळी गेल्या काही वर्षांपासून यवतमाळ शहरात दहशत माजवत असल्याचे उघड झाले.
पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांनी या टोळीच्या पूर्वीच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला. टोळीचा प्रमुख लाफ्या पवार याच्यासह त्याचे साथीदार – विशाल उर्फ भद्या वानखडे, लोकेश उर्फ सतुर बोरखडे, विशाल उर्फ लाडी कदम, रॉकी उर्फ श्रेयस वगळते, दैविक खडसे, आयुष पंचभाई, धिरज चाफेकर, यश जरांगे – यांनी मिळून अनेक गंभीर गुन्हे केले आहेत.
या टोळीने खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, महिलांचा छळ, बेकायदेशीर जमाव जमवणे, घरात घुसणे, धमकी देणे आदी प्रकारांचे गुन्हे केले आहेत. त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाईसाठी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने या गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कलमे लावण्यात आली आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चवरे, ठाणेदार रामकृष्ण जाधव तसेच अंमलदार राहुल गोरे, रविंद्र नेवारे, अंकुश फेंडर यांच्या पथकाने केली.
0 Comments