ब्रेकींग : विज पडून तरुणाचा मृत्यू; दोन जण गंभीर जखमी


यवतमाळ : वणी तालुक्यातील तेजापूर येथे अडेगाव खंडातील गट क्र. 673 मध्ये आज दुपारी सुमारे 1.30 ते 2.00 वाजेच्या सुमारास विजेचा जोरदार कडकडाट झाला. यामध्ये विज पडुन एक तरुण जागीच ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे.

धर्मरत्न सुधाकर भगत (वय 25) रा. तेजापूर असे मृतकाचे नाव आहे. तर  पूनम संजय मालेकर वय 22,  गजानन दिवाकर कोंन्डेकार वय 21  असे जखमीचे नाव आहे. जखमीवर तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही दुर्घटना गट क्रमांक 673 मध्ये घडली असून, अचानक विज कोसळल्याने तिघांनाही विजेचा धक्का बसला. त्यातील धर्मरत्न भगत याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा प्राथमिक अहवाल ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, तेजापूरमार्फत वणी तहसील कार्यालयात सादर करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments