ब्रेकींग: भावाने केला भावाचा खून; माळकीन्ही येथे धक्कादायक घटना

यवतमाळ: शुल्लक  वादातून घडलेल्या धक्कादायक घटनेत लहान भावाने मोठ्या भावाचा ईळतीच्या काठीने निर्दयी खून केला. ही घटना महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत येथील माळकीन्ही गावात आज (मंगळवार) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

निलेश अशोक रिंगे वय, 35 वर्ष रा. माळकिन्ही असे मृतकाचे नाव आहे. प्रदीप अशोक रिंगे असे आरोपीचे नाव आहे.  माळकीन्ही येथील निलेश अशोक रिंगे (वय ३५) हा आपल्या शेतात कपाशीच्या पिकात मुगाचे अंतरपिक घेतले होते. त्याचा लहान भाऊ प्रदीप हा मुगाच्या शेंगा तोडत होता. मात्र मोठा भाऊ निलेश याने शेंगा तोडण्यास मनाई केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद चिघळताच प्रदीपने हातातील ईळतीची काठी घेऊन निलेशवर तुफान हल्ला चढवला. तोंडावर व डोक्यावर केलेल्या वारांमुळे निलेश घटनास्थळीच ठार झाला.

निलेश रिंगे यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. घटनेनंतर आरोपी प्रदीप शेतातील झाडाखाली बसून होता. माहिती मिळताच महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहून प्रदीप पळ काढू लागला, मात्र महागाव पोलिसांसह गुन्हे शाखा पुसदचे स.पो.नि. धीरज बांडे, पो.ह. संतोष बेरगे, मुन्ना आडे, तेजाब रणखांब, रमेश राठोड, कुणाल मुंडकर, सुभाष यादव, सुनील पंडागळे यांच्या पथकाने त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळताच उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी हनमंतराव गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट दिली. पुढील तपास महागाव पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments