यवतमाळ : स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलच्या संयुक्त कारवाईतून यवतमाळ जिल्ह्यातील १ दरोडा व ७ घरफोड्या असे तब्बल आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. पुसद ग्रामीण पोलिस ठाण्यातील घरफोडीच्या तपासातून ही मोठी कारवाई उघड झाली. या प्रकरणी ३ आरोपींना अटक करून जवळपास ₹९४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वडद येथून आरोपी सोपान शालीक व्यवहारे (२२) , शिलानंद अर्जुन पडघणे (३०) , दिनेश शालीक व्यवहारे (२६) या तिघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी घरफोड्या व दरोड्याची कबुली दिली. १. पुसद ग्रामीण – अप.क्र. ३२४/२०२५, २. पुसद शहर – अप.क्र. १८/२०२५, ३. खंडाळा – अप.क्र. ३६/२०२५, ४. महागाव – अप.क्र. १४१/२०२५, ५. महागाव – अप.क्र. १४९/२०२५, ६. महागाव – अप.क्र. २६६/२०२५, ७. उमरखेड – अप.क्र. १४१/२०२५, ८. यवतमाळ शहर – अप.क्र. ७३०/२०२५ यामध्ये ७ घरफोड्या व १ दरोडा असा एकूण ८ गुन्ह्यांचा पर्दाफाश झाला आहे.सदर आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम मिळून ९४,५५८/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना पुढील तपासासाठी पुसद ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बी.जे. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीष चवरे (स्थानिक गुन्हे शाखा) व निरीक्षक येशोधरा मुनेश्वर (सायबर सेल) यांच्या पथकाने केली. कारवाईत स.पो.नि. धिरज बांडे, पो.उ.नि. शरद लोहकरे, पोहवा संतोष भोरगे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, रमेश राठोड, कुणाल मुंडोकार, सुनिल पंडागळे, तसेच सायबर सेलचे पोहवा सुमित पालेकर, पो.शि. दिगंबर पिलावन, मपोशि प्रगती कांबळे व रोशनी जोगळेकर यांचा सहभाग होता.
0 Comments