अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याचे आव्हान
यवतमाळ : वणी तालुक्यातील भालर रोडवरील तेल–वाळु नाल्याजवळ भीषण प्रकार उघडकीस आला आहे. येथील परिसरात मानवी सांगाड्याचे अवशेष सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या वस्तूंवरून मृतकाची ओळख पटविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची मदत मागितली आहे.
वणी पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, दि. २० ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजण्यापूर्वी घटनास्थळी मानवी सांगाड्याचे काही भाग आढळले. यामध्ये कवटी, पायाची दोन हाडे आणि अन्य चार ते पाच लहान हाडांचा समावेश आहे. सांगाड्यापासून जवळच जांभळा, गुलाबी व राखाडी रंगाची प्रिंटेड साडी, डोक्याचे केस तसेच तुटलेली प्लास्टिकची बांगडी मिळाली. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात मर्ग क्र. ५७/२०२५ कलम १९४ BNSS अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. तपास पोहेकॉ राजू देठे (ब. क्र. २२५१) करीत आहेत.
सदर मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे कोणाला या संदर्भात माहिती असल्यास वणी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
📞 संपर्क : पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, वणी (मो. ८७८८५७७८४०)
पोहेकॉ राजु देठे, वणी (मो. ७४१०५२२२५१)
0 Comments