चंद्रपूर येथे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन

खासदार प्रतिभा धानोरकर व डॉ. नामदेव किरसान यांची प्रमुख उपस्थिती


यवतमाळ : जागतिक पर्जन्यवन दिनाचे औचित्य साधून दिनांक २२ जून २०२५ रोजी दुपारी १२ वाजता चंद्रपूर येथील कामगार मनोरंजन केंद्र, उर्जानगर येथे २५ वे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या संमेलनात यवतमाळ जिल्ह्यातील पर्यावरण कार्यकर्ते, समिती सदस्य आणि पर्यावरण प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विनोद दोंदल यांनी केले आहे.

या संमेलनाचे उद्घाटन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते होणार असून, सहउद्घाटक म्हणून गडचिरोलीचे खासदार डॉ. नामदेव किरसान आणि वरोरा-भद्रावतीचे आमदार करण देवतळे यांची उपस्थिती राहणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूरचे विचारवंत, दलितमित्र व आदिवासी सेवक डी. के. आरिकर असणार आहेत. संमेलनात विशेष अतिथी म्हणून डॉ. रमेशकुमार बोरकुटे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव, उपप्रादेशिक अधिकारी उमाशंकर भादुले, सिटीपीएसचे प्रमुख अभियंता विजय राठोड, म.रा.वि.म.चे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार व महाव्यवस्थापक नंदकिशोर पांडे, आरटीओ अधिकारी किरण मोरे, दालमिया सिमेंटचे प्रतिनिधी प्रणवकुमार नायक, टेमराज माले, विनोद सातपुते, सुधीर कोरडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात पर्यावरण समतोल, हरित विकास, पर्जन्यवनाचे संवर्धन, प्रदूषण नियंत्रण यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.

या संमेलनास यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष विनोद दोंदल यांच्यासह प्रकाश खुडसंगे, आशिष भोयर, अरविंद कोडापे, अजय मांडवकर, कैलास कोडापे, संदीप तेलंगे, पद्माकर राऊत, निलेश वाभीटकर, पवन तेलंगे, रजत चांदेकर, कुणाल भोयर, मनोहर बोभाटे, दीक्षा नगराळे, करुणा वानखेडे, स्नेहल ढाले, कविता धुर्वे, प्रतिभा तातेड, जितेंद्र खोडे, वीरेंद्र चव्हाण, पवन जाधव, चंद्रकांत परचाके, प्रफुल्ल नन्ने, चेतन सामदवार, संदीप काळे, नितीन तुमडे, निखिल राऊत, चेतन दुर्गे, शैलेश आडे आदींनी पर्यावरण प्रेमी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


Post a Comment

0 Comments