आरोपी गटटु भोयर,
वय 20 वर्ष, दोन्ही रा. गणेशनगर उमरसरा
यवतमाळ याला अटक केली असून, दोन विधी
संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. सुरज गाताडे हा मित्र ऋषी भारत लामकासे
याच्यासोबत रात्री ९.३० च्या सुमारास नविन उमरसरा येथे पाळीव कुत्र्याला जेवण
घालून मोटारसायकलने परतत असताना जयसिंगपुरे यांच्या घरासमोर तिघांनी त्यांना
अडवलं. "तु काय खुन्नस बघतोस?" असा जाब विचारत वाद घालण्यात आला. यावेळी तिघांनी
शिवीगाळ करत सुरजवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यापासून बचाव करत ऋषी लामकासे
यांनी एक आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांच्यावरही चाकूने हल्ला करण्यात आला. परंतु ते थोडक्यात
बचावले. सुरजवर तुफान वार झाल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. यानंतर मित्र लड्डू
राठोड यांच्या मदतीने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र
डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या हल्ल्यामागे दोन-तीन महिन्यांपूर्वी झालेल्या
वादाचा राग असल्याचे उघड झाले आहे. मृत सुरज व आरोपी यांच्यात तांब्याच्या वायर
जाळण्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्याचाच राग मनात ठेवून हा खून करण्यात आला
असावा, असा संशय
व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात
आला. या
प्रकरणी अवधूतवाडी डीबी पथकाने गोदणी रोड परिसरातील जंगलातून आरोपींना ताब्यात
घेतले. ही कारवाई अवधूतवाडी पोलीस ठाणण्याचे ठाणेदार नरेश रणधिर, डी.बी. पथकाचे एपीआय रोहीत
चौधरी, पीएसआय
जगताप, एएसआय
गजानन वाटमोडे, सुरेंद्र
मेश्राम, हवालदार
विशाल भगत, बलवंत
शुक्ला, विलास
मुंडे, रुपेश
ढोबळे, सागर
चिरडे, कमलेश
भाेयर, योगेश
चोपडे, प्रशांत
पाटील यांनी केली.
The Menu of this blog is loading..........
0 Comments