दोन काडतुस व देशी कट्टा जप्त : आरोपी अटक

यवतमाळ : पुसद शहरातील वसंत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक युवक देशी कट्टा घेऊन फिरत होता. याबाबतची गोपनीय माहिती मिळतात पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्या ताब्यातून एक देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. 

अक्षय बाळू ससाणे, वय 23 वर्षे, रा. गोविंदनगर, पुसद असे आरोपीचे नाव आहे. पोलीस स्टेशन वंसतनगर हद्दीत दि. 30 एप्रिल 25 रोजी पोलिस स्टेशन  वसंतनगर, पुसद येथील पोलिसांना मिळालेल्या  गुप्त बातमीवरुन धनकेश्वर रोड, पुसद येथे सापळा रचून कार्यवाही केली.  आरोपी  अक्षय बाळू ससाणे, वय 23 वर्षे, रा. गोविंदनगर, पुसद याचे जवळून एक देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस एकुण किंमत 18,000/- रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करुन त्यास अटक करण्यात आले. सदरची कार्यवाही  कुमार चिंता, पोलीस अधीक्षक, यवतमाळ,  पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, हर्षवर्धन बी. जे., सहा. पोलीस अधीक्षक तथा उप-विभागीय पोलीस अधिकारी, पुसद व सतीश जाधव, पोलीस निरीक्षक, पोस्टे. वसंतनगर, पुसद यांचे मार्गदर्शनात सपोनि. प्रवीण वेरूळकर, सपोनि. सुगत पुंडगे, पोहवा. अशोक चव्हाण, सतीश शिंदे, मुन्ना आडे व संजय पवार यांनी केली.

Post a Comment

0 Comments