ब्रेकींग : चक्क कारमध्ये आयपीएल सट्टा ; तीघांना अटक : सटोडीयांनी लढवली नवीन शक्कल

यवतमाळ : आयपीएल सिजन सुरु असून, त्यावर क्रिकेट प्रेमींकडुन सट्टा जुगार लावला जातो. या माध्यमातून दररोज लाखो, करोडो रुपयाची उलाढाल होते. पोलिस कारवाईला होवू नये म्हणून सटोडीयांनी नवीन शक्कल लढवली आहे. यवतमाळ- वर्धा महामार्गावरील गलम या गावाजवळ रस्त्याच्या बाजुला कार उभी करुन त्यामध्ये आयपीएल (IPL) सट्टा घेवुन जुगार खेळविल्या जात होता. या बाबतची माहिती मिळताच एलसीबीच्या (LCB) पथकाने सदर ठिकाण गाठून तिघांवर कारवाई करुन पावने नउ लाख रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला.  

मनिष श्रीरंग घोळवे वय ४० वर्ष रा. छोटी गुजरी, यवतमाळ,  कुणाल धर्मपाल शेन्डे वय ४१ वर्ष रा. उज्वल नगर यवतमाळ,  जितेश जयप्रकाश राजा वय ४७ वर्ष रा. वारको बिल्डीग, टिळक स्मारक, यवतमाळ अशी आयपीएल जुगार खेळणा-यांची नावे आहे. दि. १ मे रोजी काही इसम एम. एच. २९. बी. व्ही. ००१९ क्रमांकाच्या कारमध्ये आयपीएल सिजन १८ मधील आज रोजीच्या मुंबई इंडीयान्स विरूध्द राजस्थान रॉयल्स या क्रिकेट मॅचवर मोबाईल फोनद्वारे सट्टा खेळवित असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी सदर वाहनाचा शोध घेतला असता, यवतमाळ ते वर्धा रोड वरील पोलीस स्टेशन कळंबच्या हददीतल गलम या गावाजवळील हायवेलगतच्या बसस्थानका जवळ सदर वाहन मिळुन आले.

मॅचवर ऑनलाईन सट्टा

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर वाहणाची पाहणी केली असता कारमध्ये मनिष घोळवे, कुणाल शेन्डे, जितेश राजा हे लॅपटॉप, टॅब व मोबाईलच्या सहायाने मुंबई इंडीयान्स विरूध्द राजस्थान रॉयल्स या किकेट मॅचवर ऑनलाईन क्रिकेट सटटा जुगार खेळवित होते. वाहणाची झडती घेतली असता एक लॅपटॉप, एक टॅब, ०६ मोबाईल व चारचाकी वाहण असा एकुण ८,७५,०२०/- रू चा मुददेमाल मिळुण आला. याप्रकरणी तीन इसमांविरूध्द पोलीस स्टेशन कळंब येथे अ.प.क. २५१/२०२५ कलम १२ अ महाराष्ट् जुगार कायदयान्वे गुन्हा नोंद करण्यात आला.

कारवाई करणारे पथक

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांचे मार्गदर्शनात पोउपनि गजानन राजमल्लू, सफौ बंडू डांगे, सफौ सै. साजिद, पोहवा प्रशांत हेडाउ, पोहवा रूपेश पाली, पोहवा योगेश डगवार, पोहवा कविश पाळेकर, पोशि दिगांबर पिलावन, पोशि आकाश सुर्यवंशी, पोशि देवेंद्र होले यांनी केली.

Post a Comment

0 Comments