यवतमाळ : देशाचे पंतप्रधान नरेंदजी मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीने देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाचे यवतमाळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळेस विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य जोतिबा फुले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन घोषणा देऊन देशात होणाऱ्या जातनिहाय जनगणने व नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी अशोकराव तिखे, अरुणराव मेहत्रे, उत्तमराव खंदारे, एम.के.कोडापे, पवन थोटे, मनोज पाचघरे, विवेक घावडे, संदीप कोरडे, संजय येवतकर, सुनयना येवतकर, अबोली देशमुख, शीतल घावडे आदी समाज बांधव भगिनी उपस्थित होते.
0 Comments