ब्रेकींग: रेशनचे तांदुळ काळ्या बाजारात ; ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त, एलसीबीच्या पथकाची कारवाई

यवतमाळ : महाराष्ट्र शासनामार्फत रेशन दुकानात वितरीत करण्यात येत असलेला तांदुळ अवैधरित्या काळ्या बाजारात विक्रीकरीता जात होता. या बाबतची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचुन रेशनच्या तांदळासह ५७,६४,२००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

शेख मोहसीन शेख कादर वय ३४ वर्ष, रा. देऊरवाडी पुनर्वसन, दिग्रस, हाफीज बेग सनाऊल्ला बेग वय ३४ वर्ष, रा. बारभाई मोहल्ला, दिग्रस व पाहिजे आरोपी तांदुळ मालक यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथक शहरात अ उघड गुन्ह्यासंबंधाने खाजगी वाहनाने पेट्रोलींग करीत होते. यावेळेस गोपनीय बातमीदाराकडून  माहिती मिळाली की, ट्रक क्र. एम.एच २९ बी.ई ८५३२ मध्ये  रेशन दुकानाचा तांदुळ हेराफेरी करुन अवैधरित्या खुल्या बाजारात विक्री करण्याकरीता आर्णी यवतमाळ मार्गे गोंदिया येथे जात आहे. त्यावरुन मनदेव घाटात  ट्रक थांबविला.  यावेळी शेख मोहसीन शेख कादर वय ३४ वर्ष, रा. देऊरवाडी पुनर्वसन, दिग्रस, हाफीज बेग सनाऊल्ला बेग वय ३४ वर्ष, रा. बारभाई मोहल्ला, दिग्रस याच्याकडे तांदळाबाबत विचारपुस केली. त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही.  त्यांचेकडे तांदुळासंबंधाने वैध कागदपत्रे वा बिल मिळून आले नाही. सदर माल शासकीय रेशन दुकानाचा असल्याबाबत प्रथम दर्शनी निष्पन्न झाल्याने सविस्तर पंचनामा करुन सदरचा ट्रक व मुद्देमाल (रेशनचा तांदुळ) पोलीस मुख्यालय, यवतमाळ येथे डिटेन करुन ठेवण्यात आला. 

तहसीलदारांनी दिला अहवाल 

सदर ट्रक मध्ये मिळून आलेल्या अवैध तांदुळाबाबत  तहसीलदार, यवतमाळ यांनी सदरचा तांदुळ सार्वजनीक वितरण प्रणाली करीता (pds) वापरण्यात येणारा असल्याबाबतचा अहवाल दिला आहे. 

तिघां विरुद्ध गुन्हा

पोलीसांनी ट्रक व रेशनचा तांदुळ असा एकुण ५७,६४,२००/- रु चा मुद्देमाल जप्त केला. पो. स्टे यवतमाळ ग्रामीण येथे ३, ७ अत्यावश्यक वस्तू अधिनियम अन्वये आरोपी शेख मोहसीन शेख कादर वय ३४ वर्ष, रा. देऊरवाडी पुनर्वसन, दिग्रस,  हाफीज बेग सनाऊल्ला बेग वय ३४ वर्ष, रा. बारभाई मोहल्ला, दिग्रस व पाहिजे आरोपी तांदुळ मालक यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कारवाई करणारे पथक

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, यवतमाळ कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक,  पियुष जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ  सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनात सपोनि संतोष मनवर, पोलीस अंमलदार योगेश गटलेवार, अजय डोळे, विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, निलेश राठोड, रितुराज मेडवे, आकाश सहारे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी केली. 

Post a Comment

0 Comments