ब्रेकींग पुरात इसम गेला वाहून

यवतमाळ : जिल्ह्यात आज जोरदार पाउस आला. त्यामुळे नदी नाल्याला पुर आला. पोफाळी तांडा (पोस्टे पोफाळी) येथील विश्वास कनिराम राठोड (वय ४५) हा आज सकाळी (२९ ऑगस्ट) दहा वाजताच्या सुमारास गावाजवळील पूल ओलांडत असताना नाल्याच्या पुराच्या पाण्यात वाहून गेला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. अद्याप मृतदेह मिळाला नसल्याने आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले आहे. तहसीलदार कार्यालयालाही याबाबत कळविण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे नाले, ओढे, तळी धोकादायक पातळीवर भरलेले असून, नागरिकांनी अशा ठिकाणी जाऊन धोका पत्करू नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Post a Comment

0 Comments