ब्रेकींग यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस; उमरखेड, महागाव तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उमरखेड आणि महागाव तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना आज, २९ ऑगस्ट २०२५ रोजी एका दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विकास मीना यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे.

भारतीय मौसम विभाग, नागपूर यांच्या २८ ऑगस्ट २०२५ च्या हवामान अंदाजानुसार, यवतमाळ जिल्ह्यासाठी २८ ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट आणि २९ ऑगस्ट रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. उमरखेड तालुक्यातील पर्जन्यमापक यंत्रात आज सकाळी ८ वाजेपर्यंत ७८ मिमी, तर महागाव तालुक्यात ३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील नदी-नाले पूर्ण क्षमतेने वाहत असून, काही ठिकाणी रहदारी पुलांवरून पाणी वाहत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळा-महाविद्यालयात ये-जा करतात. पावसाची तीव्रता आणि पूरस्थिती लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. उमरखेड आणि महागाव तालुक्यातील शासकीय आणि निमशासकीय शैक्षणिक संस्थांना आज बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रशासनाचे आवाहन: नागरिकांनी पावसामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीत सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

Post a Comment

0 Comments