पोलिसांनी माय-लेकीची केली सुटका, आरोपीला रुग्णालयात केले दाखल
यवतमाळ : गुप्तधन मिळवण्यासाठी अल्पवयीन मुलीवर चटके देत अघोरी पूजा सुरू असलेल्या प्रकाराचा भांडाफोड यवतमाळ शहर पोलिसांनी गुरुवारी केला. तब्बल गेल्या सहा सात महिन्यापासून हा प्रकार सुर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी वंजारी फाईल परिसरातील घरावर छापा टाकताच, पूजा करत असलेला इसम घरात पळत जाऊन धारदार शस्त्राने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला रुग्णालयात दाखल केले असून, या प्रकरणात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक
रामकृष्ण जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार,
वंजारी फाईल येथील महादेव परसराम पालवे
(वय ४४) आपल्या घरी दोन महिला व त्यांच्या मुलींना घेऊन अघोरी पूजा करत असल्याची
माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंचांसह छापा टाकला असता, महादेव पालवे, त्याची पत्नी, मुलगी, पिडीत १६ वर्षीय मुलगी व
तीची आई हे सर्वजण उपस्थित
होते. तपासा दरम्यान पिडीत मुलीने दिलेल्या
जबाबात, गुप्तधन
मिळवण्यासाठी तिच्या अंगावर चटके दिल्याचे, तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी बळी देण्याचा कट असल्याचे स्पष्ट
झाले. याच दरम्यान महादेव पालवेने घराच्या आत जाऊन धारदार चाकूने गळ्यावर वार करत
आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन रुग्णालयात
हलवले. या
प्रकरणात महादेव पालवे याच्यावर भारतीय दंड संहितेचे (BNS)
कलम
118(2), 137, 138, तसेच बाल न्याय (बाल संरक्षण) अधिनियम 75
आणि महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायदा
कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःचा
जीव घेण्याचा प्रयत्न केल्याने कलम 226
BNS अंतर्गतही
स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या हस्तक्षेपाने वाचला जिव
पोलिसांचा वेळीच झालेला हस्तक्षेप आणि सतर्कता यामुळे एक बालिकेसह तीच्या आईचा जीव वाचला आहे. यवतमाळसारख्या शहरात पुन्हा एकदा अघोरी अंधश्रद्धेच्या विळख्यात लोक सापडत असल्याचे दुर्दैवी वास्तव समोर आले आहे.
सात लाखासह साहित्य जप्त
गुप्तधन मिळवण्यासाठी
१६ वर्षीय मुलीवर चटके देत अघोरी पूजा सुरू असलेल्या धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश
यवतमाळ शहर पोलिसांनी गुरुवारी केला. या धाडीत सात लाख रुपये रोख, कासव, शंख, आणि अघोरी तांत्रिक पूजा साहित्याचा मोठा
साठा जप्त करण्यात आला. हे सर्व साहित्य कथित गुप्तधनासाठी
वापरण्यात येत असल्याची माहिती समोर आली असून, गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुलीचा बळी
देण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे.
0 Comments