यवतमाळ ; राज्य शासनाच्या शेतकरीद्रोही धोरणांना कंटाळून, ‘सातबारा कोरा कोरा’ यात्रेच्या निमित्ताने बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी आता लाठीकाठ्यांसह अंबोड्यावर धडकणार आहेत. “मरता येत नाही म्हणून जगतोय” – ही व्यथा आता आरोळी झाली आहे! सातबारा कोरा झाला नाही, शेतमालाला हमीभाव नाही, आत्महत्या थांबत नाहीत… आता पुरे! आता हिशोब मागायचाच! शासन फक्त आश्वासन देतं — पण… ▪️ सातबारा कोरा कधी होणार? ▪️ मेंढपाळांच्या किती पिढ्या रानावनात गारद होणार? ▪️ मच्छीमार बांधवांना न्याय कधी मिळणार? ▪️ दिव्यांगांना दिलेला शब्द कधी पाळणार? सहा हजारांचा पगार कधी सुरू होणार? हे प्रश्न रस्त्यावर उतरले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ, मच्छीमार, दिव्यांग बांधव अंबोडा गाठत आहेत. राग आहे, तळमळ आहे, पण आता कृतीसाठी स्फोटक निर्धार आहे! बच्चू कडू यांचं थेट आव्हान – "शेतकऱ्यांनो आणि शेतमजुरांनो, फसवणुकीचा हिशोब घेण्यासाठी हजारोच्या संख्येने अंबोड्यावर या! सरकारला आता झोपेतून उठवायचं आहे!" अंबोड्याची सभा निर्णायक आहे. ही सभा केवळ संतापाची अभिव्यक्ती नाही, ही भविष्याची नांदी ठरणार आहे.
0 Comments