यवतमाळ : शिवाजीनगर (ता. पुसद) येथील नाल्यामध्ये पोहायला गेलेल्या दोन बालकांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना शुक्रवार, २७ जून रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. प्रदीप एकनाथ कुरकुटे (वय अंदाजे १० वर्षे, रा. पुसद) असे मृत बालकाचे नाव आहे. तर पृथ्वीराज विठ्ठल रणमले (वय ८ वर्षे) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. आज संध्याकाळी ३.३० ते ४.०० च्या दरम्यान गावालगतच्या नाल्यामध्ये ही घटना घडली. प्रदीप हा आपल्या मावसभावाकडे पाहुणा म्हणून आला होता. दोघेही पोहण्यासाठी नाल्यात उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. प्रदीप कुरकुटे याचा मृत्यू झाला. पृथ्वीराज रणमले हा जखमी असून, त्याला तातडीने यवतमाळ येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाकडून पुढील तपास व मदतीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तहसीलदार कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात प्राथमिक अहवाल सादर केला आहे.
The Menu of this blog is loading..........
0 Comments