यवतमाळ : इसमाची हत्या करून मृतदेह पेटवून दिला. ही घटना चौसाळा जंगलात घडली असून , आज 15 मे रोजी दुपारी उघडकीस आली. या इसमाची हत्या कोणी व का केली याचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
मृतक इसमाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे दरम्यान असून, वजन सुमारे ६० ते ६५ किलो आहे. उंची अंदाजे ५ फूट ८ इंच इतकी आहे. मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला असून, त्याच्या अंगावर कथिया रंगाचा शर्ट व कथिया रंगाची अंडरवेअर होती. मात्र पायघोळ कपडे (पॅन्ट) नसल्याचे आढळून आले आहे. मृत व्यक्तीचे नाव, गाव किंवा इतर ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. या प्रकरणात लोहारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस प्रशासनाने संबंधित परिसरातील नागरिकांनी आपापल्या पोलीस ठाण्यांमध्ये मिसिंग झालेल्या व्यक्तीबाबतची माहिती तपासून लोहारा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. चौसाळा जंगलात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याला जळालेल्या अवस्थेत इसमाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने, लोहारा पोलीस स्टेशनच्या ठाणेदार यशोधरा मुनेश्वर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे व पथकाने घटनास्थळ गाठुन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेचा छडा लावण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
0 Comments