यवतमाळ
: शहरातील पाटीपुरा बोधिसत्व चौक येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते अंकुश पाटील यांच्या
आई मंदा गजानन पाटील ह्याचे आज मंगळवारी दिनांक २९ एप्रिल
रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास अकस्मात मृत्यू झाला. मृत्यू समयी त्या अंदाजे
५५ वर्षाच्या होत्या. अंतिम श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आज
संध्याकाळी ८ वाजता होणार आहे.
त्यानंतर त्यांच्या राहत्या घरी बोधिसत्व चौक, यवतमाळ येथून अंत्ययात्रा निघणार असून, पांढरकवडा
रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. एक मुलगी, एक मुलगा, सुन,
नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.
The Menu of this blog is loading..........
0 Comments