कौटुंबिक वाद, आरोपी ताब्यात
यवतमाळ: कौटुंबिक वादातून लहान भावाने लोखंडी राॅडने मोठ्या भावाच्या डोक्यावर प्रहार करून हत्या केली. ही घटना शहरातील बालाजी मंगल कार्यालय पिंपळगाव येथे नजीक आज बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
प्रमोद पंढरीनाथ पेंदोर वय 35 वर्ष राहणार तिरुपती नगर पिंपळगाव असे मृतकाचे नाव आहे. तर कवीश्वर पंढरी पेंदोर वय 34 रा. तिरुपती नगर पिंपळगाव असे आरोपीचे नाव आहे. मृतक प्रमोद याने दोन हजार सतरा मध्ये आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून तो भाड्याने राहत होता. दरम्यान आज बुधवार दिनांक 30 एप्रिल रोजी तो आई-वडिलाकडे गेला होता. तेथून परत आल्यानंतर सायंकाळी पिंपळगाव येथील बालाजी मंगल कार्यालया जवळ प्रमोद उभा होता. प्रमोद चा लहान भाऊ कवीश्वर पेंदोर याने त्या ठिकाणी आला. यावेळी दोघा भावात कौटुंबिक वाद झाला. यावेळी कवीश्वरने लोखंडी राॅडने प्रमोदच्या डोक्यावर प्रहार केला. यामध्ये रक्तस्राव होऊन प्रमोदचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच यवतमाळ शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात शवाविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेची तक्रार देण्यासाठी मृतक प्रमोदची पत्नी सपना पेंदोर यांनी शहर पोलीस ठाणे गाठले असून, गुन्हा दाखल होण्याची प्रकीया सुरु आहे. पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
0 Comments