आर्णी
(यवतमाळ) : जिल्ह्यात खुनाचे सत्र थांबता थांबत नाही. आज पुन्हा खुनाची घटना घडली
आहे. जुन्या वादातून लोखंडी रॉडने प्रहार करुन इसमाची हत्या करण्यात आली. ही घटना आज
मंगळवारी ६ मे रोजी रात्री ७.३० ते ८ वाजताच्या
सुमारास आर्णी तालुक्यातील काठोडा पारधी बेडा येथे घडली.
गुडल्या
राठोड रा. पारवा ता. घाटंजी असे मृतकाचे नाव आहे. तर मुकेश पवार रा. काठोडा पारधी
बेडा असे अरोपीचे नाव आहे. त्याच्यात गेल्या अनेक दिवसापासून जुना वाद होता.
दरम्यान आज मृतक गुडल्या हा काठोडा पारधी बेड्यावर आला होता. यावेळी पुन्हा वाद
निर्माण झाल्याने आरोपी मुकेश पवार याने लोखंडी रॉडने गुडल्या याच्यावर प्रहार
करुन त्याची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनिल
नाईक यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी आर्णी येथील
ग्रामिण रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुनिल नाईक
यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
0 Comments