ब्रेकिंग न्यूज : 'नीट' परीक्षा : मुख्याध्यापकाच्या मुलानेच केली आत्महत्या

यवतमाळ : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी च्या वतीने काल दिनांक चार मे रोजी संपूर्ण देशात एकाच वेळी नेटची परीक्षा पार पडली. यवतमाळ शहरातील नऊ परीक्षा केंद्रावर दोन हजारावर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यावर्षीचा नीट चा पेपर खूपच कठीण असल्या चा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. परीक्षा संपल्यानंतर घरी गेलेल्या विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दिग्रस शहरातील महेश नगर येथे दिनांक पाच मे रोजी रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. मृतक विद्यार्थ्यांचे वडील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

लकी सुनील चव्हाण (वय -१९) रा. महेशनगर दिग्रस असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. काल दिनांक चार मे रोजी लकी याने यवतमाळ येथील परीक्षा केंद्रावर नीट चा पेपर दिला होता. परीक्षा संपल्यानंतर तो आपल्या गावी दिग्रस येथे परत गेला होता.  त्याचा नीट पेपर चांगला न गेल्याने तो नैराश्येत होता. दरम्यान पाच मे रोजी रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास राहत्या घरीच स्लॅब हुकाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार उजेडात येताच त्याच्या कुटुंबाला धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच दिग्रस पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करून पंचनामा  मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाठी पाठविला. सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतक लकी याचे वडील सुनील चव्हाण हे मानोरा तालुक्यातील फुल उमरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे. मृतकाच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. या परिसरात शोककळा पसरली आहे.  या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास दिग्रस पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments