यवतमाळ
: माय लेकाचे सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी कुल्फी विक्रेता गेला होता. यावेळी
भांडण सोडव्यासाठी ‘तु मध्ये का आला’ म्हणून वाद करुन लाथा बुक्याने मारहाण करुन
खुन केला. ही घटना शहरातील तलावफैल परीसरात मंगळवारी २९ एप्रिल रोजी रात्रीच्या
सुमारास घडली. भांडण सोडविण्यासाठी जाणे जिवावर बेतले.
शेरू जगदीश ठाकुर (४८) रा. कानपूर उत्तर प्रदेश ह. मु. तलाव फैल यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे. तर नितीन मनोहर कटरे (३७) रा पॉवर हाऊस, तलाव फैल असे आरोपीचे नाव आहे. राधिक शेरु ठाकुर
असे फिर्यादीचे नाव आहे. राधिका हीचा १९ वर्षापुर्वी शेरू ठाकुर
याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन
मुल असून, सासू सविता काळेकर यांच्याकडे वास्तव्यास
आहे. राधिका ठाकुर ही रसवंती चालवत होती. तर तिचा
पती शेरु ठाकुर हा कुल्फी विक्रीया व्यवसाय करीत होता. राधिकासोबत
तीची मावशी कविता मनोहर कटरे व तीचा मुलगा
तलाव फैल येथे राहत होती. दिनांक २९ एप्रिल रोजी
मृतक शेरु ठाकूर हा सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घराबाहेर गेला होता. तर राधिका रसवंतीवर निघून गेली होती. त्यानंतर रात्री १०.३० वाजताच्या सुमारास
ती घरी परत आली. त्यानंतर आरोपी नितीन कटरे हा घरी परत आला. यावेळी भांडण झाल्याने भाऊजीला ठार मारल्याचे सांगितले.
त्यामुळे त्यांनी पाहणी केली. यावेळी शेरू ठाकुर हा मृतावस्थेत
दिसून आला. राधिकाची मावशी कविता आणि तिचा मुलगा नितीन यांच्यात
वाद सुरु होता. यावेळी शेरुन मध्यस्ती केली असता, तु मध्ये का, आला असे म्हणून
त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत शेरुचा मृत्यू
झाला. या प्रकरणाची तक्रार मृतकाची पत्नी राधीका शेरु ठाकुर यानी यवतमाळ
शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन शहर पोलिसांनी आरोपी नितीन कटरे याच्याविरुद्ध
गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली.
0 Comments