यवतमाळ
: घरात लग्न समारंभ असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. लग्नाच्या
पत्रिका वाटण्यापासून तर साहित्य खरेदी करण्याची लगबग सुरु होती. अशातच युवकावर काळाने
झटप घातली असून, दुचाकी अपघातात युवक जागीच ठार झाला. या घटनेने कुटुंबाच्या
आनंदावर विरजन पडले असून, गावात शोककळा पसरली आहे. ही घटना आज बुधवार दिनांक ३०
एप्रिल रोजी सायंकाळी महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या बिजोरा फाट्याजवळ
घडली.
सकलेन शेख इद्रिस वय २६ रा. शेंबाळपिपरी ह. मु. उमरखेड असे
मृतकाचे नाव आहे. तो आज ३० एप्रिल रोजी सायंकाळच्या
सुमारास दुचाकीने उमरखेड येथे जात होता. अशातच महागाव तालुक्यातील बिजोरा या फाट्याजवळ दुचाकीचा अपघात
झाला. यामध्ये डोक्याला जबरदस्त मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू
झाला. मृतक सकलेन शेख याचा 12 मे रोजी विवाह ठरला होता. मात्र
लग्नाच्या काही दिवसापुर्वीच त्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्याच्या
कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला असून, या घटनेने शोककळा पसरली आहे. या घटनेची
माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह
शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. पुढील तपास महागाव पोलीस स्टेशनचे
बीड जमादार गजानन ऐडतकर व शिपाई मोखाडे हे करत आहे.
0 Comments