दुचाकीची समोरासमोर धडक : ग्रा. प. चा ऑपरेटर ठार, दोघे जखमी

ढाणकी (यवतमाळ) YAVATMAL: सोनदाभी ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेले ऑपरेटर उमरखेड पंचायत समितीत कामानिमित्त गेले होते. आपले काम आटोपून दुचाकीने गावाकडे परत जात होते. अशातच समोरुन येणा-या दुचाकीने त्याच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात (ACCIDENT) ग्रामपंचायतचा ऑपरेटर जागीच ठार झाला. तर अन्य दोन जण जखमी झाले. ही घटना बिटरगाव रोडवरील नाल्याजवळ घडली.

बजरंग लखन भद्रावळ (२५) रा. सोनदाभी असे मृतकाचे नाव आहे. तर सुभाष लक्ष्मण देवकर ( ५५ ) रा. सोनदाभी, देवानंद मनदुमलेवाड ( २३) रा. बिटरगाव अशी जखमींची नावे आहे.  सोनदाभी ग्रामपंचायतचा ऑपरेटर बजरंग हा रोजगार सेवक सुभाष देवकर सोबत पंचायत समिती कार्यालयामध्ये बैठकीसाठी एम एच २९ बी वाय ३३६६ क्रमांकाच्या मोटरसायकलने गेले होते. बैठक आटोपून परत जात होता. समोरून येणाऱ्या एम एच २२, ८८३१ क्रमांकाच्या दुचाकीने समोरासमोर धडक दिली. या अपातात ग्रामपंचायत ऑपरेटर बजरंग याचा जागीच मृत्यू झाला. तर सुभाष देवकर, देवानंद मनदुमलेवाड हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर जखमींना व मृतकाला ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. त्यानंतर जखमींना उमरखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांना नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी बिटरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरु आहे.

 


Post a Comment

0 Comments