ट्रॅव्हल्समधून चांदीची बॅग चोरी प्रकरण , lcb ची कारवाई, SP कुमार चिंता यांची माहिती
यवतमाळ : मोहदा येथील हिंदुस्थानी धाब्यावर थांबलेल्या ट्रॅव्हल्समधून चांदीच्या दागिन्यांची बॅग चोरीच्या प्रकरणाचा छडा लावला. मध्यप्रदेशातील कुख्यात टोळने हा पर्दाफाश केला आहे. तब्बल १६ किलो १६८ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करत ७.६८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून एका मुख्य आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही घटना दिनांक २२ मे रोजी रात्री ९.२० वाजता विजय ट्रॅव्हल्स (क्रमांक NL 01 B 2901) मध्ये घडली. सराफा व्यापारी प्रतीक कोटक हे यवतमाळहून तेलंगणातील दमईगुडा येथे जात असताना, त्यांनी ८ लाख रुपयांची चांदी खरेदी करून बॅग सिटवर ठेवली होती. जेवणासाठी मोहदा येथील हिंदुस्थानी धाब्यावर थांबले असता, वॉशरूमहून परतल्यावर त्यांना बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. सुरुवातीला घाबरून ते थेट घरी गेले, मात्र २४ मे रोजी पांढरकवडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०३(२) भादंवि अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश देण्यात आले. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे संशयित क्रेटा कारमधून पळून जातानाचे दृश्य हाती आले. कारवर बनावट नंबर प्लेट लावलेली होती.
गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना आरोपींचा थांगपत्ता लागला. मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील मनावर तालुक्यातील पटेलपुरा लुन्हेरा (बुजुर्ग) येथून मोला खान रोशन खान (वय ३८) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह (मुस्ताख ऊर्फ चिलु शमशेर खान आणि शारुख खान रमजान खान – रा. खेरवा, धार) गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ७.६८ लाख रुपयांच्या चांदीच्या दागिन्यांची बॅग हस्तगत करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मोलाची भूमिका बजावली. या यशस्वी कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोउपनि धनराज हाके, व पोलीस अंमलदार सुनिल खंडागडे, सुधीर पांडे, उल्हास कुरकुटे, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सलमान शेख, सतिश फुके व नरेश राऊत यांनी केली
0 Comments