ब्रेकींग : पत्नीनेच केला शिक्षक पतीचा खुन; विद्यार्थ्यांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट

आरोपी पत्नीही मुख्याध्यापक : पाच दिवसानंतर ‘त्या’ हत्याकांडाचा उलगडा

यवतमाळ : गेल्या पाच दिवसापूर्वी लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौसाळा जंगल परिसरात जळालेल्या इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्या इसमाचा खुन कोणी व का केला हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उठे ठाकले होते. लोहारा पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. अखेर मृतकाची ओळख पटली असून, दारू पिण्याठी पैशाचा तगादा व सतत होणा-या त्रासाला कंटाळून पत्नीने बनाना शेक मध्ये विष मिश्रण करुन पतीला पाजुन खुन केला. एवढेच नाही तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शिकवणी करीता येत असलेल्या विद्यार्थ्यांची मदत घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

शंतनु अरवींद देशमुख वय 32 वर्ष रा. सुयोग नगर, यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे. तर निधी प्रशांत तिवारी ( निधी शंतनु देशमुख ) वय 23 वर्ष रा. सुयोग नगर, यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे. मृतक शंतनु हा सनराईज स्कुल येथे शिक्षक म्हणून कार्यरत होता. तर आरोपी निधी सनराईज स्कुल येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे. १५ मे रोजी चौसाळा परिसरात अनोळखी इसमाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्यामुळे मृतकाची ओळख पटविण्यासह खुन कोणी व का केला याचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. लोहारा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. लोहारा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी समांतर तपास सुरु केला. यवतमाळ जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील मिसींग असलेल्या लोकांची माहिती घेतली. सिसिटीव्ही फुटेज व तांत्रिक दृष्ट्या तपास केला. अखेर पाच दिवसानंतर या गुन्ह्याचा उलगडा झाला.

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

मृतक व आरोपी पती पत्नी असून, गेल्या वर्षभरापूर्वी त्यांनी प्रेमविवाह केला होता. तेव्हापासुन मृतक शंतनु हा दारु पिऊन शिवीगाळ करुन आरोपी पत्नी निधी देशमुख हिला मारहाण करीत होता. दारु पिण्याकरीता पैसे दे म्हणुन नेहमी तगादा लावत होता. मागील एका महिन्यांपासुन म्हणत होता की, माझ्या मोबाईल मध्ये तुझे अश्लिल फोटो व व्हिडीओ आहे. तु मला पैसे नाही दिले तर मी तुझे फोटो व व्हिडीओ व्हयरल करील अशी धमकी देत होता.
शेकमध्ये पाजले विष

सतत होणा-या त्रासाला कंटाळुन दि.13 मे 2025 रोजी पाच वाजताच्या सुमारास बनाना शेक मध्ये विष मिश्रण करुन देऊन पती शंतनु देशमुख याचा खुन केला. शिकवणी (ट्युशन) साठी आलेल्या तीन विद्यार्थ्यांनी मृतदेह प्रेत चौसाळा जंगल परिसरात विल्हवाट लावण्याकरीता मदत केल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्यावरुन पोलिसांनी आरोपी निधी प्रशांत तिवारी (निधी शंतनु देशमुख) वय 23 वर्ष रा. सुयोग नगर, यवतमाळ हिला आज दि. 20 मे रोजी अटक करण्यात आली. पुढील तपास लोहारा पोलीस ठाण्याच्या ठाणेदार पोलीस निरीक्षक यशोधर मुनेश्वर हे करीत आहे.

शर्टाच्या बाहीचा तुकडा व बटनावरून पटली ओळख

सदर गुन्ह्याचे तपासात घटनास्थळ पंचनामा करते वेळी फॉरेन्सीक टिमने मृतकाचे अर्धवट जळालेल्या शरिरावरील शर्टाच्या बाहीचा तुकडा व शर्टाचे बटन पुराव्याकामी जप्त केला होता. मृतकाची ओळख पटली नसल्याने पोलीस स्टेशन हद्दीत तसेच यवतमाळ जिल्ह्यातील तसेच आजुबाजुचे जिल्हे वाशीम वर्धा अमरावती ग्रामीण दाखल मिसींगची माहीती घेण्यात आली. यवतमाळ जिल्हयातील दाखल न झालेल्या मिसींग इसमांचा शोध घेतला असतांना गोपनीय माहिती मिळाली की, सनराईज स्कुल येथे कार्यरत शिक्षक शंतनु देशमुख हे मागील काही दिवसांपासुन बेपत्ता आहे. त्यावरुन त्याचे मित्र मनोज झाडे, आनंद क्षिरसागर, राजेश ऊईके तसेच सुजीत भांदक्कर यांचे कडुन पोलिसांनी माहिती घेतली. यामध्ये शंतनु देशमुख हा दिनांक 13 मे पासून त्यांचे संपर्कात नसल्याचे सांगितले. दि. 18 मे रोजी घटनास्थळावरुन जप्त अर्धवट जळालेल्या शर्टाच्या बाहीचा तुकडा व शर्टाचे बटन असे आर्टीकल व फोटो हे शंतनु देशमुख याचे असल्याचे सुजीत भांदक्कर याने ओळखले.

कामगिरी करणारे पथक

सदरची कामगिरी यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन लोहारा येथील पोलीस निरीक्षक यशोधर मुनेश्वर, सपोनि-आत्राम, पोउनि काळे, पोलीस अंमलदार, प्रशांत राठोड, बबलु पठान, नकुल रोडे, अतुल चव्हाण, मंजुश्री पारखे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संतोष मनवर, योगेश गटलेवार, अजय डोळे, आकाश सहारे यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments