‘मी तुला घरी सोडतो’ असं म्हणत जबरदस्तीने कारमध्ये बसवले
यवतमाळ शहरातील तरुणी मंगळवारी (२६ मे) सायंकाळी बनवासी मारोती मंदिर परिसरात गेली होती. सुमारे सात वाजता एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये आलेल्या अंदाजे ३५ वर्षीय व्यक्तीने तिला रस्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. ‘मी तुला घरी सोडतो’ असे म्हणत त्याने जबरदस्तीने तिला कारमध्ये बसवले. त्यानंतल कारमध्ये तिच्यावर गैरवर्तन सुरू केले. विरोध केल्यावर तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पेट्रोल पंपावर थांबून पेट्रोल भरलं आणि थेट गाडी नेली कॉलेज जवळील अभयारण्यात. तिथे तिच्यावर अमानुष गैरवर्तन केल. इतकंच नव्हे, तर ‘ही बाब कुणाला सांगितलीस, तर ठार मारीन’ अशी धमकी देऊन रात्री साडे दहाच्या सुमारास आर्णी मार्गावरील एका हॉटेलसमोर सोडून तो पसार झाला. घरी परतल्यानंतर तरुणीने आई व काकूला घडलेला प्रकार सांगितला. अवधूतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १३७(२), ६४(१), ३५१(२), ७५ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून आरोपीची शोध मोहिम सुरु आहे.
0 Comments