चाकुच्या धाकावर पोस्ट मास्तरले लुटले, सात लाखासह मोपेड वाहन लंपास



यवतमाळ : येथील मुख्य डाक घरातून सात लाख रुपये रोख घेवून मोपेड वाहनाने धामणगाव येथे जाणा-या पोस्ट मास्तर जात होता. अशातच वाटेतच चोरट्याने चाकुच्या धाक दाखवुन मारहाण करीत पोस्ट मास्तरची दुचाकी व रोख घेवून पसार झाले. ही घटना आज सकाळी १०.३० ते ११ वाजताच्या सुमारास करळगाव घाटात घडली.

सुभाष नारायण बारशे वय ५९ रा. तिरुपती नगर दारव्हा रोड यवतमाळ असे फिर्यादीचे नाव असून, ते बाभुळगाव येथील पोस्ट ऑफीसमध्ये पोस्ट मास्तर या पदावर कार्यरत आहे. ग्रामिण भागातील पोस्ट ऑफीसमध्ये देण्यासाठी त्यांनी यवतमाळ येथील पोस्ट ऑफीसमधून सात लाख रुपये काढले. सदर रक्कम मोपेड वाहनाच्या डीक्कीत ठेवुन ते बाभुळगावकडे जात होते. दरम्यान यवतमाळ – धामणगाव मार्गावरील करळगाव घाटाजवळ पाठीमागुन दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी गाडी अडवुन वाहनाची चाबी मागितली. यावेळी बारशे यांनी चाबी देण्यास नकार दिला. त्यामुळे चोरट्यांनी चाकुचा धाक दाखुन मारहाण करीत पोस्ट मास्तरचे वाहन व रोख घेवून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी सिसिटीव्ही फुटेज तपासले असून, तपास सुरु आहे. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती.

Post a Comment

0 Comments