यवतमाळ : येधील रहिवाशी तथा विदर्भातील जुन्या पिढीतील ख्यातनाम छायाचित्रकार आनंद उर्फ बाळ दादासाहेब वगारे यांचे शुक्रवार, 2 मे 2025 रोजी संध्याकाळी निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्यामागे अनुराधा ठोंबरे ही मुलगी, अश्विन आणि अमोल ही मुले आणि मोठा परिवार आहे. कै. बाळ वगारे यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर, एसटी कॉलनी, जाम रोड येथून शनिवारी सकाळी 10 वाजता निघेल. अंत्यविधी पांढरकवडा रोड मोक्षधामात पार पडतील. विदर्भातल्या पहिल्या व शंभर वर्षांपेक्षा अधिक इतिहास असलेल्या वगारे आर्ट गॅलरीचे ते संचालक होते. फोटोग्राफीसोबतच नाट्यक्षेत्रातही बाळ वगारे यांचे नाव संपूर्ण विदर्भात सुपरिचित होते.
The Menu of this blog is loading..........
0 Comments