यवतमाळ जिल्ह्याचा 91.51 टक्के निकाल ; दहावीतही मुलीच हुशार


यवतमाळ :  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन पध्दतीने मंगळवारी दुपारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा निकाल 51.51 टक्के लागला आहे़  बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातसुध्दा मुलीचीच आघाडी असून 94.30 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या़ तर मुले 89 टक्के उत्तीर्ण झाले़  त्यामुळे मुलांपेक्षा मुलीच हुश्शार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दहावीची परीक्षा फेब्रुवारी 2025 दरम्यान झाली. या परीक्षेसाठी जिल्ह्यात  20 हजार 157 मुले, 18 हजार 105 मुली अशा एकूण 38 हजार 262 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 19 हजार 879 मुले, 17 हजार 941 मुली अशी एकूण 37 हजार 820 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मंगळवारी जाहीर झालेल्या ऑनलाइन निकालात 17 हजार 693 मुले, 16 हजार 191 मुली असे एकूण 34 हजार 612 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 89.00 तर मुलींची 94.30 टक्के आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल 91.51 टक्के लागला आहे. 

यवतमाळ चौथ्या क्रमांकावर

अमरावती विभागात यवतमाळ जिल्हा चौथ्या स्थानावर आहे. बुलढाणा जिल्हा 95.52 टक्के घेत अव्वल ठरला असूनतर वाशिम 95.41 टक्के घेवून दुसऱ्या स्थानावर आहे. तर तिसऱ्या स्थानावर अमरावती 92.86 टक्के व यवतमाळ 91.51 टक्के निकाल लागून चौथ्या स्थानावर आहे़ विशेष म्हणजे मागील वर्षी सुध्दा यवतमाळ चौथ्याच स्थानावर होता़ तर अकोल्याचा 89.35 टक्के निकाल लागत विभागात सर्वात शेवटी आहे़ 

कळंब तालुक्याचा सर्वात कमी निकाल

आज दहावीच्या निकालात जिल्ह्याचा 91.51 टक्के निकाल लागला आहे़ यामध्ये सर्वात जास्त 95.32 टक्के निकाल नेर तालुक्याचा लागला आहे़  यात या मुलांचा 93.17 टक्के तर मुलींचा 97.26 टक्के निकाल लागला़ तर सर्वात कमी कळंब तालुक्याचा 73.83 टक्के निकाल आहे़  यात 66.80 टक्के मुलांचा, 81.73 टक्के मुलींचा निकाल आहे़ 

तालुकानिहाय निकाल

यवतमाळ      93.22, नेर  95.32, दारव्हा 92.69, दिग्रस 90.53, आर्णी 90.38, पुसद  94.50, उमरखेड 92.99, महागाव 93.14, बाभूळगाव  88.77, कळंब 73.83, राळेगाव 86.18, मारेगाव 89.75, पांढरकवडा   91.10,  झरी 91.63,  वणी  88.77,  घाटंजी 93.30 , एकूण 91.51

168 शाळांचा निकाल 100 टक्के

जिल्ह्यातील 665 शाळांचा दहावीचा निकाल लागला़ यामध्ये 168 शाळांचा निकाल 100 टक्के लागला असून 258 शाळांचा निकाल 90 टक्केच्यावर आहे़ तर 143 शाळांचा निकाल 80 टक्के लागला असून 10 शाळांचा निकाल  60 टक्के, 12 शाळांचा 50 टक्के, 7 शाळांचा 40 टक्के, 3 शाळांचा 30 टक्के, तर एका शाळेचा निकाल 20 टक्के, एका शाळेचा 10 टक्के आणि 2 शाळांचा शुन्य टक्के निकाल लागला आहे.

 


Post a Comment

0 Comments