यवतमाळ
: काश्मीरमधील पहेलगान येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ
पाकीस्तानची अंत्ययात्रा काढून पुतळ्याचे दहन केले. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज
मंगळवारी उमरखेड येथे बंदची हाक दिली होती. नाग चौक ते संजय गांधी चौक
इथपर्यंत पाकिस्तानची अंत्ययात्रा काढत संजय गांधी चौकात पुतळ्याचे
दहन करण्यात आले. या बंदला
उमरखेड शहरातील सर्व व्यापारी वर्गाने स्वयंस्मृतिने आपले प्रतिष्ठाने बंद ठेवून प्रतिसाद
दिला. संजय गांधी चौकात येते सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व सर्वसामाजिक
संघटनेचे व शहरातील व्यापारी वर्ग व नागरिकांनी एकत्र येत निषेध सभेचे आयोजन केले.
या निषेध सभेत सर्वांनी निषेध व्यक्त केल्यानंतर या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप
पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या घटनेच्या निषेध नोंदविण्यासाठी भारत सरकारला तात्काळ पाकिस्तान विरोधी
कारवाई करण्यासाठी सर्वपक्षीय व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्यामार्फत
पाठविलेल्या निवेदनातून मागणी केली आहे. या निषेध मोर्चा तर शहरातील सर्व राजकीय पक्ष, सर्व व्यापारी संघटना,
सर्वसामाजिक संघटना, गणेश मंडळे, दुर्गा उत्सव मंडळे, शहरातील
सर्व उत्सव समित्या ,शहरातील सर्व पत्रकार
संघटना व इतरही वेगवेगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी सहभाग घेतला
होता.
The Menu of this blog is loading..........
0 Comments