यवतमाळ : आपल्या साधनसंपन्नते मागे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे परिश्रम, त्याग, संघर्ष, घाम, अश्रु व रक्ताचे सिंचन आहे आणि आपल्या पूर्वजांच्या अपार कष्टामुळे आपण स्थिरस्थावर झालात मात्र अजूनही बहुसंख्य समाजबांधव दुर्लक्षित आहे त्यास आपण सर्वतोपरी मदतीचा हात द्यावा असे भावनिक आवाहन ॲड. आनंद गायकवाड यांनी केले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर डाॅक्टर्स असोसिएशन यवतमाळ तर्फे हॉटेल वेनेशियनच्या सभागृहात आयोजित सामाजिक स्नेहमिलनाच्या सोहळ्यात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डाॅ. साहेबराव कदम होते. आपण जात धर्म असा भेदभाव पाळणारी माणसे नाहीत मात्र आपली उन्नती भेदभाव पाळणाऱ्यांच्या डोळ्यात खुपत असते हे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेटिंग फॉर विजा या लेखनातील घटनांचा उल्लेख करून व अलीकडील जातीय अन्यायाच्या अनेक घटनांचा परामर्श घेतांना ॲड. गायकवाड यांनी आपण जे सामाजिक संघर्षातून कमावले त्याचे रक्षण करण्याची तजवीजही आपणच केली पाहिजे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी आंबेडकरी साहित्य व कला अकादमीचे अध्यक्ष कवडुजी नगराळे हे मंचावर उपस्थित होते.
डाॅ. साहेबराव कदम यांनी अध्यक्षीय भाषणात सामाजिक ऐक्यावर आपला विश्वास असला पाहिजे, शिका,संघटित व्हा व संघर्ष करा ही त्रिसूत्री अंमलात आणणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्रिशरण पंचशील घेण्यात येऊन बाबासाहेबांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले. विविध स्पर्धेचे आयोजन तथा सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत गीते झालीत. बुद्ध व भीमगीतांवर बालक तसेच महिला व पुरुषांनी सुद्धा ठेका धरला. कार्यक्रमाचे संचालन डाॅ. विवेक गुजर यांनी केले तर आभार डॉ. विरेंद्र खडसे यांनी मानले.
याप्रसंगी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर डाॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. मेहुल साळवे, सचिव डाॅ. प्रशांत तामगाडगे, कोषाध्यक्ष डाॅ. अनिल उमरे,डॉ. अतिश गजभिये, डॉ. अरुण जनबंधू, डॉ. अमोल खडसे, डॉ. श्रीकांत मेश्राम, डॉ. राजरत्न निथळ, डॉ. राहुल भगत, डॉ. झनक मानकर, डॉ. नीरज मोडक, डॉ. विकास जगताप, डाॅ. रोशन शेंडे, डॉ. रश्मी तामगाडगे, डॉ. रुपाली साळवे, दीपाली खडसे, रश्मी खडसे, डॉ. गीतांजली गुजर, तारुलता मेश्राम, डॉ. सुप्रिया उमरे, डॉ. माधुरी जनबंधू, डॉ. प्रीती गजभिये, सायली गुरदे, सुजाता मानकर व डॉ. संगीता कदम इत्यादींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
0 Comments