यवतमाळ : जिल्ह्यातील वडकी पोलिस स्टेशन हद्दीतून, MH 40, CM 3230 या आयशर वाहनातून गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक करत असल्याची गोपनीय माहीती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन नाकाबंदी करून सदर वाहन पकडले. त्यात 12 बैल ( गोवंश) किंमत 2,40,000/-रुपये आणि आयशर वाहन क्रमांक MH 40, CM 3230 किंमत 20,00,000/-रुपये असा एकूण 22,40,000/-रुपये किंमतीचा माल मिळाला. आरोपी आबिद नूर कुरेशी, वय 26 वर्ष, रा. महेंद्र नगर पाण्याची टाकी जवळ नागपूर, जगदीश भीमराव लिंगायत, वय 37 वर्ष, रा. सेक्टर नं. 17 ओले नगर, कोराडी नागपूर यांचे ताब्यातून मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी त्यांचेवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5, 5 अ, 5 ब प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11 अन्वये गुन्हा नोंद करून पुढील कारवाई करण्यात येत आहेThe Menu of this blog is loading..........
0 Comments