सरपंचाला दोरखंडाने बांधून काढला घागर मोर्चा

सावरगाव येथील नागरिकांची उपविभागीय कार्यालयावर धडक 

यवतमाळ : उन्हाळ्याची चाहुल लागताच पुसद तालुक्यातील सावरगाव येथे पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न पेटला आहे. गावातील नागरिकांनी सरपंचाला दोरीने बांधून घागर मोर्चा काढून उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. प्रशासना बद्दल तिव्र नाराजी व्यक्त करुन जलजिवन मिशनचे काम पुर्ण करुन पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी केली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर जल’ ही योजना जाहिर केली आहे. ग्रामिण भागातील प्रत्येक गावात जलजिवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनाही राबविण्यात येत आहे. पुसद तालुक्यातील सावरगाव या गावातही जलजिवन मिशन अंतर्गत काम मंजुर झाले होते. मात्र सदर काम अर्धवट असून, सदर गावात पाण्याची समस्या निर्माण झाली असून, गावक-यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या गावक-यांनी चक्क सरपंचाला दोरीने बांधुन त्याच्या शर्टवर ‘बेईमान सरपंच’ असे लिहीले. त्यानंतर उपविभागीय कार्यालयावर धडक देवून घागर मोर्चा काढला. गावातील पाण्याचा प्रश्‍न निकाली काढून पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments