ब्रेकींग : बांधकाम कामगार नोंदणी घोटाळा उघड : कळंबमध्ये बनावट प्रमाणपत्राचे रॅकेट; एजंटवर एफआयआर

यवतमाळ : बांधकाम कामगार नोंदणीसाठी बनावट प्रमाणपत्रे तयार करून सामान्य लोकांकडून अवाजवी पैसे उकळणाऱ्या श्री साई कंप्युटरया आस्थापनावर अखेर महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. या प्रकरणात आस्थापना मालक प्रज्वल शिरसकर याच्यावर BNS कायद्यानुसार कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रधान सचिव (कामगार) यांच्या निर्देशानुसार, मुख्य कार्यकारी अधिकारी म. इ. व. इ. बा. का. क. मंडळ मुंबई यांच्या आदेशावरून अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत बोगस बांधकाम कामगार नोंदणी प्रकरणी विशेष तपास मोहीम हाती घेण्यात आली होती. त्याअंतर्गत कळंब येथे श्री. साई कंप्युटरमध्ये बनावट प्रमाणपत्रे तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती राजेश वनारे (यवतमाळ) व सतीश देशमुख (बुलढाणा) यांना मिळाली. दि. १ जुलै २०२५ रोजी दुपारी १ वाजता कळंब पोलीस स्टेशनच्या फौजदार राजेश चौधरी यांच्या उपस्थितीत पंचासमक्ष साई कंप्युटरवर छापा टाकण्यात आला. तपासणी दरम्यान नगर पंचायत, कळंब यांच्या सहीचे कोरे ९० दिवसांचे कामाचे बनावट प्रमाणपत्र सापडले. तसेच चंदा संतोष डिघुले व सुमन चंद्रभान बोरकर यांच्या नावाने बनावट प्रमाणपत्रांची झेरॉक्स प्रति आढळून आली. नगर पंचायत, कळंबच्या अधिकाऱ्यांनी लेखी दिलेल्या माहितीप्रमाणे, नमूद क्रमांकाचे प्रमाणपत्र कार्यालयीन नोंदीतच नसल्याचे स्पष्ट झाले. यावरून सदर प्रमाणपत्रे ही पूर्णपणे बनावट असून, फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी प्रज्वल शिरसकर याच्यावर BNS 2023 अंतर्गत कलम 318(4), 336(3), 349 नुसार एफआयआर दाखल करण्यात आला असून, पोलीस विभाग पुढील तपास करीत आहे.

 

Post a Comment

0 Comments