मटका व्यावसायिकाची आत्महत्या : तीन मटका संचालकांना न्यायालयीन कोठडीत

पांढरकवडा : शहरातील मटका तथा सट्‌टा व्यवसायाशी संबंधित मंगेश किसन वासेकर यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अन्य तीन मटका व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. १७ जुलै २०२५ रोजी तिघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्जुभाई ऊर्फ अजरोहोद्दीय हाफीजउद्दीन शेख (रा. शिवाजी पुतळा), डेविड ऊर्फ विनोद गंगाराम राजुरकर (रा. आठवडी बाजार), आणि विजय सिताराम झोटींग (रा. शास्त्री वार्ड) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.२ जून २०२५ रोजी मंगेश वासेकर यांनी आपल्या दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हे दुकान मटका पट्टी फाडण्याचे ठिकाण म्हणून ओळखले जात होते. या आत्महत्येमागे आर्थिक अडचणी व कर्जबाजारीपणा हे कारण असल्याची चर्चा त्या वेळी शहरात झाली होती. घटनेनंतर सुरू झालेल्या तपासात पोलिसांनी वासेकर यांच्यावर दबाव आणणाऱ्या इतर मटका व्यावसायिकांची माहिती गोळा केली. त्यानुसार वरील तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. 

Post a Comment

0 Comments