ब्रेकींग: मजुरांच्या पिकअपला अपघात; एक जण ठार , सहा मजूर जखमी

अमोल वासनिक / नेर / तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील रेणुकापूर फाट्याजवळ शनिवारी सकाळी मजुरांची टाटा पिकअप गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात पुंडलीक ऊर्फ गोलू मोहन चव्हाण (वय 30, रा. मोझर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अन्य सहा मजूर जखमी झाले आहेत.

पुंडलीक चव्हाण हे ठेकेदार शेख शाकीर यांच्या कडे बांधकाम मजुरीचे काम करीत होते. नेर येथून सकाळी 8 वाजता ते नांदगाव खंडाळा येथे जात असताना, रेणुकापूर फाट्याजवळ सिमेंट पोल कारखान्याजवळ गाडीचे मागील टायर अचानक फुटले. त्यामुळे गाडीवरील चालक अरबाज अली अमजद अली (वय 28, रा. वलीसाहब नगर, नेर) याचे नियंत्रण सुटले आणि टाटा पिकअप गाडी (MH11AG3947) उलटली. या अपघातात पुंडलीक चव्हाण यांच्यासह शंकर राठोड, हरीचंद चव्हाण, शेषराव जाधव, कल्पेश गुरनुळे, मयुर प्रधान आणि आशीफ भुन्या हे मजूर जखमी झाले. गंभीर जखमींची अवस्था पाहता त्यांना तत्काळ यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच पुंडलीक चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या घटनेनंतर पुंडलीक यांचे वडील मोहन चव्हाण यांनी नेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments