जमिनीसाठी संघर्ष : पारधी बेड्यावरील नागरिकांनी नोंदवले आक्षेप

यवतमाळ : शासनाच्या वतीने जिल्ह्यात अनेक गावात सौर उर्जा प्रकल्प उभारण्याचा सपाटा सुरु आहे. त्याच प्रमाणे आर्णी तालुक्यातील काठोडा पारधी बेडा येथेही मुख्यमंत्री सौर प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी गावातील जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या संदर्भात आर्णी तहसील कार्यालयाने आक्षेप, हरकती मागितल्या आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवुन आक्षेप नोंदवित निवेदन देण्यात आले. 
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या नोटिशीविरोधात आणि आपल्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या जमिनीवरील हक्काची रक्षा व्हावी,यासाठी रहिवाशांनी हा आक्षेप मांडला. मागील ३० ते ३५ वर्षांपासून वरील जमिनीवर घरे बांधून वास्तव्यास आहे. शेती व्यवसायावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. शासनाच्या विविध योजनांतर्गत घरकुले मंजूर झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अचानक आलेल्या नोटिशीमुळे त्यांच्यावर बेदखलीचा धोका निर्माण झाला असून, त्यामुळे त्यांच्या जीवनावर मोठे संकट ओढावण्याची शक्यता आहे. जाहीरनामा रद्द करावा व संबंधित रहिवाशांना त्यांच्या जमिनीवर कायदेशीर हक्क देण्यात यावे. गाव नमुना-८ मध्ये त्यांच्या मालकी नोंदी करून द्याव्यात, अशी  मागणी करण्यात आली. या प्रसंगी अनंता राठोड, सुभाष राठोड, नागुबाई राठोड, नयना राठोड, मंजना राठोड, बिंडल राठोड, नुरेश चव्हाण, कासू पवार, विना राठोड, शालू राठोड, आनु राठोड, सेवगा चव्हाण, सोनम चव्हाण, आजाब राठोड, करुणा राठोड, दिलीप पवार, शिकिन चव्हाण, संदीप राठोड, प्रा.पंढरी पाठे उपस्थित होते. कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले. 

Post a Comment

1 Comments

  1. Khar lihitat bhau tumhi aashch sapot kara bhau

    ReplyDelete